बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना खुश करण्यासाठीच केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाजूने वक्तव्य करत आहेत, असा आरोप ग्रामीण विकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी आज केला.
शहरातील अनगोळ येथील भेटीनंतर आज मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री ईश्वरप्पा यांनी उपरोक्त आरोप केला. गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या ग्रामीण विकास खात्याचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात अनेक वक्तव्य केली आहेत.
आता डी. के. शिवकुमार यांच्यावरून त्यांनी वरीलप्रमाणे आणखीन एक वक्तव्य केले आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर कारवाईची मागणी करत असताना दुसरीकडे बेळगाव ग्रामीण मतदार संघातील मराठी भाषिकांची मते मिळवण्यासाठी केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार समितीच्या बाजूने बोलत आहेत, असेही ते म्हणाले.