कर्नाटक मंत्रिमंडळाने सोमवारी 100 कोटी रुपयांच्या व्हेंचर कॅपिटल फंडाला मंजुरी दिली आहे. ज्याचा उपयोग उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी केला जाईल.
इलेक्ट्रॉनिक्स, आय टी, बी टी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत निधीची स्थापना व वितरण केले जाईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इलेक्ट्रिक वाहने आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत स्टार्टअप्समध्ये भांडवल जमा करण्यासाठी हा फंड असेल.
तरुणांना वाव देऊन नवीन उद्योग निर्मितीसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. स्टार्ट अप चे स्वरूप आणि एकंदर प्रकल्पाचा आढावा घेऊन त्यास अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.