बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल दोन लाखांचा ऐवज लांबवला आहे. मल्लिकार्जुन नगर येथे घडलेली घटना उघडकीस आली असून मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
चोरट्यांनी समोरच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून 42 ग्रॅम सोने, 55 ग्रॅम चांदीचे दागिने, तीन हजार रुपये रोख रक्कम, दोन एटीएम कार्ड पळवले आहे.
घटनेची माहिती समजताच पोलिस निरिक्षक मल्लीकार्जुन तुळशीगेरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.
चंद्रगौडा पाटील हे घर मालकाचे नाव असून ते आणि त्यांचे कुटुंबीय आपल्या घराला कुलूप लावून दांडेली येथे गेले होते. मध्यरात्रीनंतर चोरीचा प्रकार घडल्याचा संशय असून ही घटना उशिरा उघडकीस आली आहे. घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात येताच ही घटना उघडकीस आली असल्याची माहिती मिळाली असून चोरट्यांचा उपद्रव शहरात वाढीस लागला आहे.