हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या प्रकरणातील सुनावणी आता सोमवारी होणार आहे .काल शुक्रवारी ही सुनावणी होणार होती. मात्र काही कारणाने न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली असून सोमवार कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तोवर कामकाजावर स्थगिती कायम आहे. हा बायपास सुपीक जमिनीतून केला जात होता. शेतकऱ्यांच्या उगवलेल्या उभ्या पिकातून जेसीबी चालवून बायपास बनविण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
या प्रकरणी शेतकर्यांनी विरोध केला असता त्यांच्यावर दडपशाहीचे धोरण राबवण्यात आले. यामुळे शेतकरी न्यायालयात गेले असून आता न्यायालयीन लढा सुरू झाला आहे .या प्रकरणी आठवे दिवाणी सत्र न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार होती .मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता सोमवारी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वारंवार शेतकऱ्यांना न्यायालयात जाऊन आपल्या जमिनीसाठी चा लढा लढावा लागत आहे. वेगवेगळ्या भूसंपादन प्रकल्पांमध्ये शेतकरी न्यायालयीन लढा देऊ लागले असून न्यायालयीन लढ्या नंतरच आपली मातृभूमी जमीन वाचवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.