belgaum

गौंडवाड (ता. जि. बेळगाव) येथील श्री साई भैरवनाथ स्पोर्ट्स आणि ग्रामस्थांच्यावतीने उद्या रविवार दि. 12 डिसेंबर रोजी जीवायएमके गौंडवाड यमनापूर व कंग्राळी बी.के. या तीन गावांसाठी मर्यादित प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सदर स्पर्धा गौंडवाड येथील महात्मा गांधी हायस्कूल मैदानावर खेळविली जाणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उद्या रविवारी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर स्पर्धेतील विजेत्या संघास आकर्षक चषकासह 20,000 रुपयांचे भरघोस बक्षीस दिले जाणार आहे.Goundwad

त्याच प्रमाणे उपविजेत्या संघास चषक व 10,000 रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला क्रिकेट साहित्याचा संच बक्षिसादाखल दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक सामन्यातील सामनावीर पुरस्कारासह उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट झेल आणि मालिकावीर ही वैयक्तिक बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली आहेत.

सदर स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. स्पर्धेसाठी आज युद्धपातळीवर मैदानाची साफसफाई करून रोलरच्या सहाय्याने चांगली खेळपट्टी बनविण्यात येत आहे.

प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी गौंडवाड येथील क्रिकेटपटू आणि क्रीडाप्रेमी विशेष परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.