तीन वर्षानंतर बेळगाव येथे विधीमंडळाचे अधिवेशन होत आहे.अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील समस्यांवर प्रामुख्याने चर्चा होणे आवश्यक आहे.त्यामुळे अधिवेशनाची मुदत आणखीन एक आठवडा वाढवण्याची मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली आहे.
यासंबंधी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना पत्र पाठविण्यात आले असून प्रमुख विषयांवर चर्चा करण्यासाठी किमान आणखीन एक आठवड्याची मुदत वाढ करण्याची मागणी या पत्रात केली आहे.
बेळगाव येथे दहा दिवसांचे अधिवेशन होत आहे. पूर, अतिवृष्टी, उत्तर कर्नाटकातील पाणी योजना, बेरोजगारी, प्रादेशिक समतोल, भ्रष्टाचार आदि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायची आहे.
अधिवेशन काळात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचा अवमान झाला आहे. विरोधी पक्षांच्या मागण्यांकडे सरकार पाठ फिरवत आहे. त्यामुळे चर्चेसाठी किमान आणखीन एक आठवडा अधिवेशनाला मुदतवाढ देण्याची मागणी सिद्धरामय्या यांनी केली आहे.