कर्नाटकातील अमृत योजनेअंतर्गत बेळगाव शहरातील सांडपाणी व्यवस्था वगळता उर्वरित सर्व विकासकामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण आणि शहरी विकास खात्याचे मंत्री कौशिक किशोर यांनी दिली.
राज्यसभेमध्ये बेळगावचे खासदार इरण्णा कडाडी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. बेळगाव शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 17.22 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून प्रगती 100 टक्के आहे.
शहराच्या सांडपाणी प्रकल्पावर 162.73 कोटी रुपये खर्च झाले असून प्रगति 36 टक्के आहे. एसपीएम रोडवरील शिवाजी उद्यानाची सुधारणा करण्यात आली आहे. यासाठी 0.5 कोटी रुपये खर्च झाला असल्याचेही मंत्री कौशिक किशोर यांनी सांगितले.
याखेरीज हनुमाननगर येथील हरित जागा सुधारणा प्रकल्पासाठी 2.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजीनगर येथील उद्यानावर 1.33 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
यापध्दतीने एकुण बेळगाव शहरात 184.28 कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प राबविण्यात आले आहेत, असेही मंत्री कौशिक यांनी स्पष्ट केले.