Friday, December 27, 2024

/

डिजिटल युग अस्तित्वात आणतय कलेची नवी संकल्पना : रेवणकर

 belgaum

डिजिटल युग हे कलेला मारक नसून ते कलाकारांना एक वेग॓ळी नवी संकल्पना, कलेचा एका नवा प्रकार अस्तित्वात आणण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, असे मत पेंटिंग आणि इतर कलाप्रकारात अनेक पारितोषिके मिळविलेले कलाकार दिनेश वामन रेवणकर यांनी व्यक्त केले.

आपल्या आयुष्याच्या 60 वर्षांमधील महत्त्वाची 30 वर्षे पूर्व आफ्रिकेतील केनिया येथे व्यतीत करणाऱ्या दिनेश रेवणकर यांच्या कलेला त्याठिकाणी विशेष करून तेथे येणाऱ्या जगभरातील पर्यटकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे त्यांना केनियन कलाकार म्हणून ओळखले जाण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या तुकड्या तुकड्यामधील वैशिष्ट्यपूर्ण तिंगातिंगा कलेची प्रशंसा केली जाते.

रेवणकर नुकतेच आपल्या मूळगावी बळेगावला परतले आहेत. त्यांनी आपल्या पेंटिंगची प्रदर्शने फक्त आपल्या देशातच नाही तर पूर्व आफ्रिकेतील केनिया आणि इतर ठिकाणी देखील भरविली आहेत. चित्रकला दिर्घकाळ माझ्या जीवनाची अंग बनली असल्यामुळे ती माझ्या जीवनाची प्रतिबिंब बनवली आहे, असे दिनेश रेवणकर म्हणतात.Revankar

मुंबईच्या पारंपरिक जीवनशैलीपासून नैरोबियाचा हरित प्रदेश आणि पुन्हा परत बेंगलोरची प्रभावी सिलिकॉन व्हॅली या माझ्या दीर्घ प्रवासात कले बाबतचे माझे प्रेम माझ्यातील कल्पना आणि भावनांना प्रेरणा देणारे ठरले. मुंबई, नैरोबिया आणि बेंगलोर या तीन शहरांमधील समुदाय सरावामुळे एक व्यावसायिक कलाकार आणि डिझायनर म्हणून माझ्या ओळखीला खरा आकार मिळाला, असे रेवणकर यांनी सांगितले.

युरोपियन फिल्म फेस्टिव्हल पोस्टर स्पर्धा, फ्रेंच कल्चरल सेंटर येथील केनियन आर्ट पॅनोरामा, एचडीएफसी कॅलेंडर स्पर्धा आदी विविध स्पर्धांमध्ये दिनेश रेवांकर यांनी पारितोषिके मिळविली आहेत. केनियाचे राष्ट्रीय संग्रहालय, पणजी -गोवा येथील कला अकॅडमी आदी अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कलेची प्रदर्शने भरवली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.