Thursday, April 25, 2024

/

कोरोना मृतांच्या वारसदारांना धनादेश वाटप

 belgaum

गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील वारसदारांना कर्नाटक सरकारतर्फे 1 लाख रुपयांचे सहाय्यधन मंजूर करण्यात आले असून ते सहाय्यधन आमदार ॲड. अनिल बेनके यांनी नुकतेच वितरित केले.

कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना शहरातील आपल्या कार्यालयांमध्ये बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सरकारकडून मंजूर झालेल्या सहाय्यधनाचे धनादेश वितरीत केले.

याप्रसंगी लाभार्थींसह बेळगाव तहसीलदार, तलाठी व सरकारी अधिकारी उपस्थित होते. राज्यातील भाजप सरकार कोरोना प्रादुर्भाव काळात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या कुटुंबातील वारसदारांना 1 लाख रुपये सहाय्यधन देत आहे.

 belgaum

तेंव्हा बेळगाव उत्तर मतदार संघातील संबंधितांनी सहाय्य धनासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये अर्जाची नोंद करावी व त्या संदर्भात कोणतीही अडचण अथवा समस्या उद्भवल्यास आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.