Saturday, December 21, 2024

/

कर्नाटकात 566 नवीन कोविड-19 प्रकरणांची नोंद

 belgaum

दैनंदिन कोविड प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत असताना, कर्नाटकात बुधवारी 566 नवीन संसर्गाची नोंद झाली असून एकट्या बेंगळुर अर्बनमध्ये त्यापैकी 400 आहेत, ज्यामुळे राज्यातील सक्रिय प्रकरणांची संख्या 7,771 वर पोहोचली आहे.
राज्यात एकाच दिवसात 566 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. 3 ऑक्टोबर रोजी 664 प्रकरणे नोंदली गेली होती.यानंतर 6 ऑक्टोबर रोजी राज्यात 523 प्रकरणे नोंदवली गेली होती. त्यानंतर बुधवार धक्कादायक ठरला असून एकूण बाधितांची संख्या 30,05,798 वर पोहोचली आहे आणि मृतांची संख्या 38,324 झाली आहे.

बुधवारी राज्यभरात झालेल्या सहापैकी चार मृत्यूची नोंद बेंगळुरमध्ये झाली. चित्रदुर्ग आणि तुमकुरू येथे आणखी दोन जणांची नोंद झाली. दक्षिण कन्नडमध्ये 33, कोडगु आणि कोलारमध्ये प्रत्येकी 14, उडुपीमध्ये 17 आणि हसनमध्ये 31 प्रकरणे नोंदवली गेली.

दिवसाचा मृत्यू दर 1.06% होता तर पोझीटीव्हिटी दर आता 0.52% आहे. दिवसभरात 245 डिस्चार्ज झाले.
कोलार जिल्ह्यातील श्रीनिवासपूर तालुक्यातील सोमयाजलहल्ली येथील एकूण 10 मोरारजी देसाई निवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, असे ब्लॉक शिक्षण अधिकारी व्ही उमादेवी यांनी सांगितले.

बाधित विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. वर्ग खोल्या आणि वसतिगृह स्वच्छ केल्यानंतर वर्ग पुन्हा सुरू करण्यात आले.मंड्या जिल्ह्यातील मद्दूर तालुक्यात, हलिकेरे सरकारी प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थ्यांना कोविडची लागण झाली आहे.

“शाळेत 50 विद्यार्थी आहेत. जवळपासच्या गावातील विद्यार्थी शाळेत जातात. काही विद्यार्थ्यांमध्ये सर्दी आणि ताप यासारख्या कोविड लक्षणांची तक्रार असल्याने सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नुकत्याच चाचण्या घेण्यात आल्या.
पाच विद्यार्थ्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत,” असे जिल्हा निरिक्षण अधिकारी डॉ संजय यांनी सांगितले.

सकलेशपूर तालुक्यातील देवीहल्ली आणि अनेमहल येथील कॉफी इस्टेटमध्ये काम करणाऱ्या पश्चिम बंगालमधील तेवीस मजुरांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मजूर गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमधून तालुक्यात परतले होते. सावधगिरीचा उपाय म्हणून कामगार परत आल्यानंतर त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. ओमिक्रॉन पसरू नये म्हणून नमुने पुढील चाचण्यांसाठी पाठवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.