कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगावात होणार आहे या पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी चिकोडी येथे करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधानपरिषद निवडणूक १० रोजी होणार आहे.
यानंतर मतमोजणी बेळगावात करायची की चिकोडीत याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र याच काळात हिवाळी अधिवेशन होणार असल्यामुळे मतमोजणीची चिकोडी येथे करण्यात येणार आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश जारी केला आहे.
14 डिसेंबर रोजी सकाळी 8 पासून चिकोडी येथील आरडी पीयू कॉलेजमध्ये मतमोजणी होणार आहे. यापूर्वी बेळगाव येथे मतमोजणीसाठी तयारी करण्यात आली होती. काही शिक्षण संस्थांना भेटी देऊन इमारतींची पाहणी करण्यात आली होती. मात्र 13 ते 24 डिसेंबर पर्यंत कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुवर्ण विधानसौध येथे होणार असल्यामुळे मतमोजणीचे ठिकाण चिकोडी येथे हलविण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करण्यात येत असून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आता चिकोडी येथे मतमोजणी होणार आहे .
बेळगाव जिल्ह्यासाठी आर्थिक विभागाच्या सचिव डॉ एकरूप कौर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे. निवडणुकीसंबंधी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास ८७६२३४९०९२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.