राज्यात आज झालेल्या विधान परिषद निवडणुकीत लढविलेल्या सर्व जागांवर भारतीय जनता पक्ष विजय मिळवेल असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावला भेट दिली.
माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे. आम्हाला मिळालेल्या अहवालानुसार, भाजपला सर्वत्र पूरक वातावरण असल्याने लढविल्या सर्व जागा आम्ही जिंकू असा विश्वास आहे.
विधान परिषद निवडणुकीचे मतदान सुरु असताना मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव भेटीमुळे वातावरण बदलले आहे का या प्रश्नावर, मुख्यमंत्र्यांनी ‘यावर तुम्हीच उत्तर दिले पाहिजे’ असे सांगितले. प्रत्येक निवडणूक मतदारांच्या हातात असते.
पोटनिवडणूक असो किंवा विधान परिषद निवडणूक, पाय घट्ट असेल तरच विजय निश्चित होतो असे त्यांनी सांगितले.
अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर स्वाभाविकच चर्चा होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकही येथेच घेण्याचा विचार आहे. म्हादई विवाद, भूसुधारण कायदा दुरुस्ती विधेयक अशा अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, विधान परिषदेसाठी मतदान सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांनी अचानक बेळगावला दिलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. त्यांच्या भेटीचा भाजपला फायदा होणार का हे १४ डिसेंबरलाच उमगणार आहे.