कर्नाटक व गोवा राज्याला जोडणाऱ्या एनएच -748 एए या राष्ट्रीय महामार्गाच्या साकलेम ते बेळगाव पर्यंतच्या 0.000 ते 69.480 कि. मी. अंतराच्या रस्त्याचे भारतमाला परियोजनेंतर्गत अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) तत्त्वावर दुपदरीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा काढली आहे.
सदर रस्त्याचे दुपदरीकरण करण्याचे काम 2 वर्षात पूर्ण करावयाचे आहे. रस्ता दुपदरीकरणाचा मार्ग मच्छे, पिरनवाडी, नावगे, किणये, कुसमळी, जांबोटी, कालमनी, कणकुंबी, पोरिम, मतनी व साकलेम अर्थात (साखळी -गोवा) असा असणार आहे.
यापूर्वी बेळगाव -खानापूर दरम्यानच्या एनएच -748 या महामार्ग बांधकामाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता भारतमाला परियोजना अंतर्गत साकलेम ते बेळगाव या चोर्ला रस्त्याचे दुपदरीकरण करण्याची योजना आखण्यात आली आहे.