सतीश जारकीहोळी फाउंडेशन प्रस्तुत आणि नंजनगुड स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित वज्रदेही -2021 या कर्नाटक राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘वज्रदेही -2021’ किताब बेळगाव जिल्ह्याच्या विकास सूर्यवंशी याने हस्तगत केला. त्याप्रमाणे ‘बेस्ट पोझर’ पुरस्काराचा मानकरी बेळगावचा उमेश गणगणे हा ठरला.
नंजनगुडीच्या देवीरामण्णा हिलगेट येथील नंदी कन्व्हेंशन हॉलमध्ये उपरोक्त राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा गेल्या रविवारी सायंकाळी यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेतील विजेतेपदाचा वज्रदेही -2021 हा किताब बेळगाव जिल्ह्याच्या विकास सूर्यवंशी याने मिळविला, तर त्याच्या मागोमाग बेंगलोरचे रुबेल आणि राहुल सिंग हे शरीर सौष्ठवपटू स्पर्धेतील अनुक्रमे फर्स्ट रनरअप आणि सेकंड रनरअप ठरले.
अलीकडे प्रत्येक शरीर सौष्ठव स्पर्धेतील उत्कृष्ट पोझरचा पुरस्कार मिळवणाऱ्या बेळगावच्या उमेश गणगणे यांने ती परंपरा या राज्यस्तरीय स्पर्धेत कायम ठेवून बेस्ट पोझरचा किताब आपल्याकडे राखला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार सतीश जारकीहोळी, माजी खासदार ध्रुवनारायण, माजी आमदार कलाली केशवमूर्ती, राकेश मल्ली आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते यशस्वी शरीरसौष्ठवपटूंना आकर्षक करंडकासह रोख भरघोस रकमेची बक्षिसे देण्यात आली. सदर वजनी गटात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे आहे.
55 किलो गट : 1) बसवानी गुरव बेळगाव, 2) अफताब किल्लेकर बेळगाव, 3) आकाश निगराणी बेळगाव, 4) सुंदरेश बेंगलोर, 5) प्रशांत के. शिमोगा. 60 किलो गट : 1) उमेश गंगणे बेळगाव, 2) अविनाश धारवाड, 3) हनीफ विजयनगर, 4) मोहम्मद मंतजईम चिक्कमंगळूर, 5) अभिलाष उडपी. 65 किलो गट : 1) अरुणगौडा बेंगलोर, 2) सोमशेखर उडपी, 3) रोहन फर्नांडिस मंगळूर, 4) मेहबूब विजयनगर, 5) आकाश शिमोगा. 70 किलो गट : 1) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, 2) श्रवण बेंगलोर, 3) राकेश कांबळे बेळगाव, 4) चेतन मलकोडी धारवाड, 5) राम बेळगावकर बेळगाव. 75 किलो गट : 1) जे. सी. नाईक चित्रदुर्ग, 2) चेतन कोटीयान उडपी 3) वरूणकुमार जीव्हीके दावणगिरी, 4) शैलेशकुमार मंगळूर, 5) अविनाश सुवर्णा मंगळूर. 80 किलो गट : 1) राहुल सिंग बेंगलोर, 2) प्रशांत शिमोगा,
3) सुरज एस उडपी, 4) अफरोज ताशिलदार बेळगाव. 5) गजानन काकतीकर बेळगाव. 85 किलो गट : 1) रुबल बेंगलोर, 2) चेतन बेंगलोर, 3) लिखत शिमोगा, 4) जहार उडपी, 5) अविनाश केएसआरटीसी हासन. 85 किलो वरील गट : 1) विकास सूर्यवंशी बेळगाव, 2) नित्यानंद कोटीयान उडपी, 3) अल्लाबक्ष बेंगलोर, 4) गणेश गोपाळ बेंगलोर 5) मसूद मंगळूर. वज्रदेही -2021 टायटल विजेता : विकास सूर्यवंशी (बेळगाव जिल्हा).