देव तुमचे भले करणार नाही : बिशप फर्नांडिस-हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार धर्मांतर विरोधी कायदा संमत करण्याच्या तयारीत असून यासंदर्भात मी सरकारला इशारा देतो की जपून राहा. देव तुमचे भले करणार नाही, असे उद्वेगजनक उद्गार बेळगाव धर्मप्रांताचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी काढले आहेत.
राज्य सरकार बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये धर्मांतर विरोधी कायदा संमत करण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी धर्मांतर हे समाजासाठी अयोग्य आहे.
धर्मांतरामुळे कुटुंबात समस्या निर्माण होतात. स्वार्थासाठी समाजातील गरीब आणि वंचित घटकांना जाळ्यात अडकवण्याचे हे षडयंत्र आहे, असे सांगून यासाठीच धर्मांतर विरोधी कायदा असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बेळगाव धर्मप्रांताचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी मी सरकारला इशारा देतो की जपून राहा देव, तुमचे भले करणार नाही, असे म्हंटले आहे.
घटनेने प्रत्येकाला आपल्या धर्माचा दावा आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिले असताना राज्य सरकार त्याच्यावर कसे काय निर्बंध घालू शकते? असा सवालही बिशप फर्नांडिस यांनी केला आहे. प्रलोभन आणि धर्मांतर कशाला म्हणतात याबाबतच्या स्पष्टतेची व्याख्या या कायद्यातून दिसली पाहिजे, असेही ते म्हणाले.