बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात बीम्स, गुलबर्गा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि म्हैसूर मेडिकल कॉलेज येथील जीनोमी सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा या आठवड्यापासून सॅम्पल अर्थात नमुने स्वीकारण्यास सुरुवात करणार आहेत.
राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे मुख्य सचिव टि. के. अनिलकुमार यांनी ही माहिती दिली आहे. सदर महाविद्यालयांमध्ये त्यासाठी आवश्यक साहित्य धाडण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रसंगी राज्य सरकारने बेंगलोर, म्हैसूर, शिमोगा, हुबळी, मंगळूर आणि विजयपुरा येथे जीनोमी सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा स्थापण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
या सहा प्रयोगशाळा पैकी चार प्रयोगशाळा वैद्यकीय शिक्षण खात्याच्या आणि दोन आरोग्य खात्याच्या अखत्यारित येतात.