Wednesday, January 22, 2025

/

.. अखेर ‘या’ रस्त्याने घेतला एकाचा बळी!

 belgaum

बेळगुंदी ते राकसकोप या अत्यंत खराब रस्त्याच्या स्वरुपातील मृत्यूच्या सापळ्याने अखेर एकाचा बळी घेतला आहे. या रस्त्यावर गेल्या मंगळवारी रात्री मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाऊ कंग्राळकर या मोटरसायकलस्वाराचा आज उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाला.

बेळगुंदी ते राकसकोप या खाच-खळगे पडून अत्यंत खराब झालेल्या रस्त्यावर गेल्या मंगळवारी रात्री सोनोली नाल्यानजीक दोघा मोटरसायकल स्वारांची रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही मोटरसायकलस्वार जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती उपचारांती सुधारली. मात्र भाऊ नारायण कंग्राळकर (वय 50) या दुसऱ्या मोटरसायकलस्वाराची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या भाऊ याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्याचा मेंदू मृत (ब्रेन-डेड) झाल्याचे घोषित केले होते. मृत झाल्याप्रमाणे असला तरी भाऊ कंग्राळकरवर जिवंत असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. तथापि उपचाराचा फायदा न होता आज त्याचा मृत्यू झाला.

या पद्धतीने अपघातप्रवण बनलेल्या बेळगुंदी ते राकसकोप रस्त्याने अखेर भाऊ कंग्राळकर यांच्या स्वरूपात एकाचा बळी घेतला आहे. तेंव्हा आता तरी लोकप्रतिनिधी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागे व्हावे. त्यांनी या जीवघेण्या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आणखी बळी जाण्यापूर्वी सदर रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करून डांबरीकरण करावे, अशी जोरदार मागणी पुनश्च एकवार या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांकडून केली जात आहे.Bhau kangralkar rakaskopp

राकस्कोप ते बेळगुंदी रस्त्याच्या दुरुस्तीवरून काही दिवसांपूर्वी मोठे राजकारण तापले होते दुरुस्ती करा या मागणीसाठी या भागातील लोकांनी रस्ता रोको देखील केला काही राजकीय आंदोलन करत रस्ता खड्डे बुजवतांना फोटो सेशन केले होते मात्र प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनीधिनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

याच रस्त्याच्या दुरुस्तीवरून लावलेल्या फलकावर वक्तव्य करताना भाजपच्या माजी आमदारांची जीभ घसरली होती अन असले फलक मराठी लावण्याचे मराठी लोक करतात असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं त्यानंतर हे प्रकरण मोठे होऊन चक्क त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

एकीकडे विद्यमान लोकप्रतिनिधींनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं तर इतर विरोधकांनी देखील याकडे कानाडोळा केला आहे.दोन्ही राजकीय पक्षाच्या चिखल फेकी मुळे रस्त्याचे काम खोळंबळे आहे त्याचा फटका सामान्य माणसांना बसत आहे असा आरोप केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.