Friday, December 27, 2024

/

क्रीडा स्पर्धांसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

 belgaum

बेळगाव शहर परिसरातील शाळा महाविद्यालय आणि पदवीपूर्व महाविद्यालयांच्या रद्द करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर आयोजित केल्या जाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी इशारा वजा मागणी शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडापटूंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडापटूंनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या हे उचित होते. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भाव निवळला असून सर्व जनजीवन पूर्ववत सुरळीत सुरू झाले आहेत.

चित्रपटगृहे, बाजार पेठ सर्व कांही खुले करण्यात आले आहे. निवडणुका व अधिवेशनासाठी तर महिनाभर आधी तयारी केली जात आहे. तथापि कोरोनाचे कारण देऊन यंदाच्या शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवरील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. हा प्रकार अन्यायकारक आहे. यामुळे अनेक उदयोन्मुख होतकरू क्रीडापटूंची मानसिक खच्चीकरण होऊन ते निराश झाले आहेत. क्रीडा स्पर्धांमध्ये चमकण्यासाठी क्रीडापटू अहोरात्र मेहनत घेत असतात.

मात्र आता एका रात्रीत शाळा-महाविद्यालयांच्या सर्व क्रीडा स्पर्धा कोरोनामुळे रद्द केल्या जात असल्याची घोषणा करण्यात आल्यामुळे क्रीडापटूमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तेंव्हा आपण याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर आयोजित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.Sports

निवेदन सादर करतेवेळी शहरातील विविध शाळा महाविद्यालयाचे क्रीडापटू बहुसंख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्पोर्ट्स जर्किन आणि ट्राऊझरमध्ये उपस्थित ही मुलंमुली सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होती. मागील वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी आवाज उठविला नव्हता. मात्र यंदा कोरोना निवळला आहे. निवडणुका आणि अधिवेशनासाठी महिनाभर आधी जोरदार तयारी केली जाते.

मात्र क्रीडापटूंचा क्रीडा स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याचे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे क्रिडापटूमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. क्रीडा स्पर्धेत चमकण्यासाठी क्रीडापटू अहोरात्र मेहनत घेत असतात. आता एका रात्रीत सर्व क्रीडा महोत्सव रद्द करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे. हा सरळ सरळ अन्याय आहे.

तरी जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणी लक्ष घालून शालेय तसेच महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर भरवल्या जातील अशी व्यवस्था करावी, अशी मागणी आपण केली असल्याची माहिती एका क्रीडा प्रशिक्षकाने प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.