बेंगलोर येथील समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर शाई फेकून वातावरण बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरासह उपनगरी भागात आणि ग्रामीण भागातही शिवप्रेमी नागरिकांतून प्रचंड निषेध व्यक्त होत आहे. बेळगाव शहराच्या पूर्वेला असलेल्या सांबरा गावाने कडकडीत बंद पाळून रविवारी आपला निषेध व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे सीमावर्ती भागात आपले दैवत मानले जातात. या दैवताचा आवमान म्हणजे संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा अपमान असे मानले जाते. यामुळेच सांबरा ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळपर्यंत कडकडीत बंद पाडण्याचा निर्णय घेऊन छत्रपती शिवरायांच्या प्रती असलेला आपला आदर दाखवून दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर शाई फेकून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्यानंतर सीमा भागात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामुळे 144 कलम लागू करण्यात आला आहे .
सोमवारपर्यंत 144 कलम लागू राहणार आहे .त्यामुळे कोणत्याही प्रकारचा जमाव न करता शांततेच्या मार्गाने आपला निषेध व्यक्त करण्याचा निर्णय शिवप्रेमी नागरिकांनी घेतला आहे.
गावागावात फलक आणि निषेधाच्या माध्यमातून त्या घटनेचा विरोध केला जात आहे .समाज कंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी होत आहे.