परदेशातून येऊन ओमिक्राँन बाधित झालेल्या आजमनगर येथील बाधीताची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे .शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील 1103 जणांचे स्वाब तपासणीसाठी देण्यात आले होते हे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन नवे रुग्ण आढळून आले असून त्यासंदर्भातील खबरदारी घेतली जात आहे.
बेळगाव तालुक्यातील दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याच बरोबरीने अथणी चिकोडी खानापूर रामदुर्ग रायबाग सौंदत्ती तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नसल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
2940 हून अधिक जणांचे स्वाब तपासणी साठी देण्यात आले असून त्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. बेळगाव जिल्ह्यातील एकूण बधितांची संख्या 80 हजार 70 वर पोहोचली आहे.
त्यापैकी 79027 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. 97 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 946 वर गेला आहे.
60 हजारांहून अधिक जण 14 दिवसांच्या होम केअर मध्ये आहेत त्यामुळे ओमिक्राँनची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली आहे.