तीन विकासकामे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पित

0
6
City corp
 belgaum

बेळगाव उत्तर मतदारसंघात राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक 21 रोजी आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोंमाई यांच्या हस्ते या विकास कामांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी कळविले आहे .

मागील वर्षात दीड वर्षाच्या काळात योग्य तो पाठपुरावा करून बेळगाव उत्तर विभागात अनेक महत्त्वाची विकास कामे राबविण्यात आली.

ही विकास कामे अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा मनोदय होता. तो साध्य झाला असून मंगळवारी तीन वेग वेगळ्या विकास कामांचे लोकार्पण होणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले आहे.Railway bus stand

 belgaum

मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता नेहरूनगर येथील माहेश्वरी अंध शाळेसमोरील अंतरराष्ट्रीय सुसज्जित स्टेडियमचे उद्घाटन होणार असून लगेचच सायंकाळी सहा वाजता बेळगाव महानगरपालिकेत बांधण्यात आलेल्या नव्या आयनॉक्स इमारतीचे उद्घाटन होणार आहे.City corp

यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नवीन अद्ययावत बसस्थानक उद्घाटन करून लोकार्पित केले जाणार आहे अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या तिन्ही कार्यक्रमाचे उद्घाटन करून त्याचे लोकार्पण केले जाईल असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.