स्पाइस जेट कंपनीने बेळगाव ते दिल्ली विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दि. 20 डिसेंबरपासून आठवड्यातील चार दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे.
स्पाइस जेट कंपनीची लेह -दिल्ली -बेळगाव -दिल्ली -लेह अशी विमानसेवा येत्या सोमवार दि. 20 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. ही सेवा सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे आठवड्यातील चार दिवस सुरू राहणार आहे.
बेळगाव ते दिल्ली मार्गावर सुरू होणाऱ्या या नव्या विमानसेवेमुळे नवी दिल्ली येथे वरचेवर काम असणाऱ्या बेळगावातील नागरिक, उद्योजक, व्यापाऱ्यांसह राजकीय नेते मंडळी तसेच संरक्षण खात्यातील अधिकारी व जवानांची आता चांगली सोय होणार आहे.