जिल्ह्यात नव्याने 6 रुग्ण : सक्रिय रुग्ण झाले 92- बेळगाव जिल्ह्यात आज शुक्रवारी नव्याने 6 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 92 वर पोचली आहे.
जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद झाली नसल्यामुळे कोरोना मृतांची संख्या 946 वर स्थिर आहे. नव्याने आलेल्या 6 रुग्णांमुळे आजपर्यंत जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना बाधितांची संख्या एकूण 80,068 इतकी झाली आहे.
शहरात गेल्या 15 डिसेंबर रोजी नायजेरिया रिटर्न ओमिक्रॉन रुग्ण आढळून आला आहे. त्याचप्रमाणे राज्यात आज नव्याने 238 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.