बेळगाव पोलीस आयुक्त डॉ त्यागराजन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ एम बी बोरलिंगय्या यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने बजावले आहेत. डॉक्टर एम बी बोरलिंगय्या हे 2008 आयपीएस अधिकारी असून ते या अगोदर गुप्तचर खात्यात एसपी म्हणून कार्यरत होते.एस पी पासून त्यांची आता डीआयजी पदी बढती झाली असून त्यांना बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त पद बहाल करण्यात आले आहे
डॉ त्यागराजन यांची बदली बेळगावहून बंगळुरू पोलीस रिक्रुटमेंट विभागात डी आय जी पदी करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त म्हणून त्यागराजन यांनी
इंग्रजांनी 27 जून 2020 या रोजीतत्कालीन पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांच्या जागी बेळगाव पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती जवळपास दीड वर्षे बेळगाव त्यांनी बेळगाव चे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले त्यानंतर आता त्यांचे 31 डिसेंबर 2019 रोजी बदलीचे आदेश जारी झालेला आहे.
राज्य गृह खात्याने कर्नाटक राज्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी 31 रोजी जारी केले आहेत राज्य सरकारचे अधिकारी जेम्स थकल यांनी या बदल्यांचे आदेश बजावले आहे त्यात त्यागराजन, आय पी एस अधिकारी संदीप पाटील आदींच्या बदल्यांचे आदेश आहेत.
गेल्या आठवड्यात बेळगावात झालेल्या अधिवेशनात देखील बेळगावात झालेल्या अनेक तणावाच्या घटनांच्या पाश्वभूमीवर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे संकेत मिळत होते त्यानुसार बेळगाव पोलीस आयुक्तांची बदलीचा आदेश आला आहे अशीही चर्चा आहे