मागील दोन दिवसांपासून सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेक झाल्यानंतर सीमाभागात बऱ्याच अंशी तणाव निर्माण झाला आहे. या परिस्थितीत काही कन्नड संघटनांच्या म्होरक्यांनी जी शाई फेक केली आहे त्याचे परिणाम उमटत आहेत. नुकतीच कर्नाटकात भगवा ध्वज जाळल्याने महाराष्ट्रातही लाल-पिवळ्या ध्वज जाळण्यात आला.
त्याचे पडसाद सीमाभागात बऱ्याचअंशी उमटले आहेत. मात्र बेंगलोर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे कडोली गावात गदारोळ माजला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाबद्दल येथे मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते. जोरदार घोषणा देऊन त्यांनी बेंगलोर येथे कर्नाटक सरकारचा निषेध केला आहे.
बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काळे फासण्यात आले. त्याचे पडसाद कडोली येथे रात्री उशिरापर्यंत दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू सम्राट होते. त्यांनी कोणत्याही जाती भेद पंथ यांचा भेदभाव केला नाही. मात्र काही कन्नड संघटनेच्या म्होरक्यांनी त्यांचा अवमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु दैवत आहेत. मात्र त्यांचा अवमान करणे हे चुकीचे आहे. ज्या वेळी मोगलांशी लढत असताना छत्रपती शिवाजी महाराज जात-पात भेद विसरून सर्व धर्मीयांना घेऊन स्वराज्य स्थापन केले. अशा परिस्थितीत त्यांचा अवमान करणे हे चुकीचे आहे.
त्यांच्या या कारभारामुळे बऱ्याच अंशी संताप व्यक्त करण्यात येत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर हिंदू बांधवांना हिंदू म्हणून घेणेही अवघड होणार होते. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सर्वस्व पणाला लावून हिंदूधर्म टिकवला आहे. मात्र या कन्नड म्होरक्याना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नसल्याने त्यांचा अवमान करण्यात आला आहे.
छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या गुंडांवर कारवाई करावी अशी मागणी जोरदार करण्यात आली आहे. याचबरोबर सीमाभागातही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. जेणेकरून यामुळे तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार नाही. याची दक्षता कर्नाटक सरकारने घ्यावी अन्यथा सीमा भागातून जोरदार आंदोलन करण्याचा इशाराही कडोली ग्रामस्थांनी दिला आहे. परिणामी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशी कोणतीही कृती होणार नाहीत याची दखल कर्नाटक सरकारने घ्यायला हवी मात्र जेणेकरून कर्नाटक सरकार छत्रपती हे फक्त मराठी भाषिकांचे आहेत असे भासवून त्यांचा अवमान करत आहेत.
यापुढे अशा घटना घडल्यास त्याचे परिणाम कर्नाटक सरकारला भोगावे लागतील असा इशाराही कडोली ग्रामस्थांतून देण्यात आला आहे. यावेळी संपूर्ण गावातील नागरिक उपस्थित होते. याचबरोबर शनिवारी गावात संपूर्ण बंद पाडण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला आहे.