बेळगाव शहरातील गांधीनगर मुख्य रस्त्याशेजारी जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागून शेकडो गॅलन पाणी वाया जात असल्याचे वृत्त आज सकाळी बेळगाव लाईव्हने प्रसिद्ध करताच अवघ्या 2 तासात जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
गांधीनगर मुख्य रस्त्या शेजारील जलवाहिनीला आज शनिवारी सकाळी गळती लागल्यामुळे शेकडो गॅलन पाणी वाया जात होते. या मार्गावरील एचपी पेट्रोल पंपपासून संकम हॉटेल पर्यंतच्या मार्गावर जलवाहिनीतील पाण्याचे पाट वाहत होत.
या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे लवकरात लवकर दुरुस्त करण्याची गरज व्यक्त करण्यात येत होती.
बेळगाव लाईव्हने याबाबत आवाज उठवून वृत्त प्रसिद्ध करताच शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले.
अवघ्या दोन तासात जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू झाल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असून बेळगाव लाईव्हबद्दल प्रशंसोद्गार काढले जात आहेत.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1512710822419839/