कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडीबिल्डर्स संघटनेच्या मान्यतेने सतीश जारकीहोळी फाउंडेशन प्रस्तुत ‘वज्रदेही -2021’ ही भव्य बक्षीस रकमेची राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा येत्या रविवार दि. 19 डिसेंबर 2021 रोजी नंजनगुड येथे आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरील ‘मि. इंडिया’ किताबाच्या स्पर्धेची निवड चांचणी देखील असणार आहे.
इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या (मुंबई) नियमानुसार येत्या रविवारी दुपारी ठीक 4 वाजता नंजनगुड येथील जुनियर कॉलेज मैदानावर सुरू होणारी ही शरीरसौष्ठव स्पर्धा नंजनगुड स्पोर्ट्स फौंडेशनतर्फे आयोजित केली जाणार आहे. स्पर्धा 55 किलो, 60, 65, 70, 75, 80, 85 किलो आणि 85 किलोवरील अशा एकूण 8 वजनी गटात घेतली जाणार आहे. स्पर्धकांची वजन तपासणी रविवारी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत केली जाणार आहे.
स्पर्धेच्या प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे ‘वज्रदेही -2021’ टायटल विजेत्या स्पर्धकाला 30 हजार रुपयांचे भरघोस पारितोषिक दिले जाणार असून फर्स्ट रनर्सअपला 20 हजार रुपये आणि सेकंड रनर्सअपला 10 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. याखेरीज ‘बेस्ट पोझर’ किताब मिळवणाऱ्या स्पर्धकाला 8000 रुपये बक्षिसादाखल दिली जातील.
‘वज्रदेही -2021’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा फक्त कर्नाटकातील शरीरसौष्ठवपटूंसाठी मर्यादित आहे. या स्पर्धेद्वारे राष्ट्रीय स्तरावरील ‘मि. इंडिया’ शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी शरीरसौष्ठवपटूंची निवड चांचणी होणार आहे.
तरी शरीरसौष्ठवपटूंनी यांची नोंद घेऊन घ्यावी, तसेच अधिक माहितीसाठी उमामहेश (8494880242) अथवा गंगाधर एम. (9845857270) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.