कर्नाटकात 45 लाख जणांना प्रतीक्षा कोविड लशीच्या दुसऱ्या डोसची: खाजगी रुग्णालयांमध्ये प्रचंड साठा आहे-
कर्नाटकात 45.14 लाख लोक त्यांच्या दुसऱ्या कोविड लसीच्या डोससाठी प्रतीक्षेत आहेत.दुसर्या डोससाठी येणार्या लोकांमध्ये 41.75 लाख मध्ये सर्वसामान्य नागरिकच नव्हे , तर तब्बल 77,406 आरोग्य कर्मचारी आणि 2.62 लाख फ्रंटलाइन कर्मचारी देखील आहेत, ज्यांना अंशतः लसीकरण किंवा लसीकरण न केल्याच्या धोक्यांची चांगलीच जाणीव आहे.
ऑक्टोबरमध्ये, राज्याने सप्टेंबर (66.46 लाख) पेक्षा 13.25 लाख कमी दुसऱ्या डोसचे नियोजन केले.
ऑक्टोबर महिन्यात, फक्त 53.21 लाख डोस देण्यात आले. राज्यात दुसऱ्या डोससाठी सर्वाधिक मागणी असलेले पाच जिल्हे आहेत,यामध्ये बंगळूर शहर (11.84 लाख), बेळगाव (2.54 लाख), म्हैसूर (2.39 लाख), बेंगळुरू ग्रामीण (2.19 लाख) आणि गुलबर्गा (1.72 लाख) यांचा समावेश आहे.
राज्याचे आरोग्य आयुक्त डी रणदीप यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील सणासुदीच्या काळात डोस घेण्याबद्दल निरुत्साह दिसल्याचे कारण दिले आहे, तर खाजगी रुग्णालयांचे म्हणणे आहे की लाखो लोकांना दुसरा डोस देणे बाकी असूनही आणि त्यांच्याकडे लसीचे हजारो डोस उपलब्ध असूनही ते वापराविना पडून राहिले आहेत.
काही लोक ज्यांनी पहिला डोस घेतला आहे ते दुसऱ्यासाठी येत नाहीत कारण त्यांना एकतर नवीन आजाराचे निदान झाले आहे किंवा केमोथेरपीसारखे उपचार पुन्हा सुरू केले आहेत, ज्यामुळे ते पहिल्या किंवा दुसऱ्या डोससाठी अपात्र ठरतात,यामुळे डोस शिल्लक पडत आहेत.
इतर कारणांपैकी एक म्हणजे सुरुवातीला नियोजित केलेल्या दोन डोसमधील विस्तारित अंतर हे आहे. परिणामी लोक त्यांचा दुसरा डोस घेण्यापूर्वी गावी किंवा कामाच्या ठिकाणी स्थलांतरित झाले असून त्यापैकी अनेक जणांनी दुसऱ्या ठिकाणी आपला दुसरा डोस घेतला असण्याची शक्यता आहे.