Friday, November 15, 2024

/

दोघा मोबाईल चोरट्यांना अटक

 belgaum

खडेबाजार परिसरातून मोबाईल लांबविल्या प्रकरणी दोघा चोरट्यांना खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे.हुबळी व राणे बेन्नूर येथील ते दोघे असून त्यांच्यावर एक महिन्यापूर्वी मोबाईल लांबवल्या चा आरोप ठेवण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक दिलीप निबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. संशयावरून या दोघांना अटक करण्यात आली आहे.

30 ऑक्टोबर ला खडेबाजार परिसरात ही घटना घडली होती. आपला मोबाईल चोरीला गेला असून घरी फोन करण्यासाठी आपला मोबाईल द्या,अशी मागणी करण्यात आली होती. मदतीच्या उद्देशाने एका व्यक्तीने दिलेला मोबाईल घेऊन ते दोघे पसार झाले होते.

दरम्यान याच प्रकारच्या एका गुन्ह्यात शिरसी पोलिसांच्या ताब्यात हे चोरटे लागले होते. त्यानंतर लागलीच न्यायालयाला अर्ज करून त्या दोघांना खडेबाजार पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.