दोन डोस अथवा आरटी -पीसीआरची सक्ती-महाराष्ट्र, केरळ आणि गोवा राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र सक्तीचे असेल.
तसेच याच्या तपासणीसाठी 23 आंतरराज्य आणि आंतरजिल्हा तपासणी नाके स्थापण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र, गोवा किंवा केरळ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अथवा 72 तासांपेक्षा जुने नसलेले आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र सक्तीचे असणार आहे.
तसेच सरकारच्या आदेशानुसार विशेषतः वैद्यकीय आणि नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अधिक कडक तपासणी केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.