विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार आज रविवारी बेळगावात येणार आहेत.
रविवारी रात्री 10 वाजता त्यांचे बेळगावात आगमन होणार असून, सोमवारी 29 रोजी बेळगावात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची भेट घेऊन विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत.
प्रभारीची नियुक्ती
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केपीसीसीने बेळगाव आणि चिक्कोडी येथे दोन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
काँग्रेसचे माजी सदस्य इव्हान डिसोझा यांची बेळगाव मतदारसंघाचे तर आमदार एन हॅरिस यांची चिक्कोडी जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.