विधान परिषदे निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तिघेही दिग्गज उमेदवार मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत.भाजपकडून महंतेश कवटगीमठ, काँग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष म्हणून लखन जारकीहोळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे त्या रोजीच्या सगळ्यांचा नामांकन होणार आहे.
लखन जारकीहोळी हे आपल्या हजारो समर्थकासह सरदार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर कवटगीमठ आणि हट्टीहोळी अर्ज दाखल करणार आहेत ते शक्ती प्रदर्शन करतील की नाही याची माहिती उपलब्ध झाली नाही.
मंगळवार हा सर्वांसाठी शुभ दिन असून राहू काल सुरू व्हायच्या अगोदर नामांकन करू शकतात.सगळे मतदान करणारे लोकनियुक्त सदस्य कुणाच्या पारड्यात मतदान करतील यावर सर्व काही अवलंबून असणार आहे.