कर्नाटक राज्यातील महसूल खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या तालुक्यांमधील शासकीय कार्यालय असणाऱ्या इमारतींना ‘मिनी विधानसौध’ या नांवानेच ओळखले जात होते. मात्र आता राज्य सरकारने हे नांव बदलले असून ‘तालुका प्रशासन सौध’ असे नामकरण करण्यात आले आहे.
राज्यातील तालुकास्तरावर महसूल खात्यासह सरकारी कार्यालय एकाच छताखाली आणून जनतेला अनुकूल होण्यासाठी मिनी विधानसौध नांवाने इमारती बांधण्यात आल्या आहेत.
तेथेच सर्व तालुका पातळीवरील सरकारी कार्यालयांचे कामकाज चालते. या इमारती सर्वच ठिकाणी मिनी विधानसौध या नांवाने ओळखल्या जातात. मात्र भाषा धोरणाचे कारण सांगून या इमारतींना तालुका आडळीत सौध (तालुका प्रशासन सौध) असे नामकरण करण्यात आले आहे.
या इमारतींचे नांव बदलण्यासंबंधी कर्नाटक विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व अन्य कांही जणांनी मागणी केली होती. त्यानुसार महसूल खात्याने या संबंधीचा निर्णय घेत आदेश पत्रक जारी केले आहे.