कोल्हापूर जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांनी संयुक्तरीत्या कालकुंद्री (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे आयोजित केलेल्या कोल्हापूर व बेळगाव जिल्हा मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘स्वराज्य श्री -2021’ हा किताब बेळगावच्या प्रताप कालकुंद्रिकर याने पटकाविला. विशेष म्हणजे प्रताप हा मुळचा कालकुंद्री येथीलच आहे.
कालकुंद्री येथे नुकत्याच पार पडलेल्या या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या प्रत्येक गटामध्ये बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंनी वर्चस्व राखले. स्पर्धेतील ‘बेस्ट मस्कुलर’ आणि ‘बेस्ट पोझर’ हे किताब देखील बेळगावच्या अनुक्रमे बसवाणी गुरव आणि राजकुमार दोरगुडे यांनी हस्तगत केले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून एम. एम. गंगाधर, सुनील राऊत, अनंत लंगरकांडे, बसवराज अर्लीमट्टी, नूर मुल्ला व राजेश वडाम यांनी काम पाहिले. स्पर्धेतील गटवार पहिल्या पाच क्रमांकाचे विजयी शरीरसौष्ठवपटू खालील प्रमाणे आहेत.
55 किलो वजनी गट : अवधूत निगडे (कोल्हापूर), आकाश निगराणी (बेळगाव), अल्ताफ किल्लेदार (बेळगाव), शानूर अंकली (बेळगाव), राजकुमार दोरगुडे (बेळगाव). 60 किलो वजनी गट : बसवाणी गुरव (बेळगाव), उमेश गंगणे (बेळगाव), दिनेश नाईक (बेळगाव), तौसिफ मुजावर (बेळगाव), चेन्नया कलमठ (बेळगाव). 65 किलो वजनी गट : राकेश कांबळे (बेळगाव), रवी इंगवले (कोल्हापूर), आदित्य काटकर (बेळगाव), शैलेश मजुकर (बेळगाव),
ओमकार गोडसे (बेळगाव). 70 किलो वजनी गट : प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), युवराज जाधव (कोल्हापूर), सुनील भातकांडे (बेळगाव), संदीप पावले (बेळगाव), रितेश धनावडे (कोल्हापूर). 75 किलो वजनी गट : राम बेळगावकर (बेळगाव), रोहित भोगन (कोल्हापूर), महेश गवळी (बेळगाव), राहुल फिग्रीडो (कोल्हापूर), ऋग्वेद भोसले (कोल्हापूर). 75 किलो वरील वजनी गट : अफरोज तहसीलदार (बेळगाव), गजानन काकतीकर (बेळगाव), सौरभ मगदूम (कोल्हापूर), प्रशांत भोसले (कोल्हापूर), प्रतीक बाळेकुंद्री (बेळगाव).