हेस्काॅमकडून तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे येत्या रविवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील कांही भागांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
शहरातील वीज पुरवठा खंडित केल्या जाणाऱ्या भागांमध्ये कणबर्गी, उद्यमबाग, नेहरूनगर, श्रीनगर आणि वडगाव या भागांचा समावेश आहे.
या भागांमधील कणबर्गी एक्जीबिशन सेंटर, शिवालय, उद्यमबाग, चेंबर ऑफ कॉमर्स, गुरुप्रसाद कॉलनी, डच इस्टेट, बेम्को, अशोक आयर्न, अरुण इंजीनियरिंग, एकेपी औद्योगिक वसाहत,
गॅलेक्सी, जीआयटी, शांती आयर्न, जैतन माळ, भवानीनगर, नेहरूनगर, इंडाल, वैभवनगर, अशोकनगर, सुभाषनगर, विश्वेश्वरय्यानगर, शिवाजीनगर, शिवबसवनगर, जनबकुळ, सिव्हिल हॉस्पिटल, श्रीनगर, महांतेशनगर, श्रीनगर,
चन्नम्मासर्कल, आयसीएमआर, अंजनेयनगर, सदाशिवनगर व वडगाव येथील वीजपुरवठा येत्या रविवारी दिवसभर खंडित राहणार आहे. तरी नागरिक आणि उद्योजकाने याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्काॅमने केले आहे.