Friday, April 19, 2024

/

सृष्टी देसाईच्या ‘या’ गीताला श्रोत्यांचा प्रतिसाद

 belgaum

कार्तिकी एकादशीनिमित्त युट्युबवर सृष्टी पवन देसाई हिने सादर केलेल्या ‘एकवार पंढरीला नवा…’ या गीताला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकणारी सृष्टी ही मुळची खानापूरची असून आतापर्यंत विविध गायन स्पर्धांमध्ये तिने पारितोषिके मिळवली आहेत.

सध्या झी टीव्हीवर सुरू असलेल्या ‘लिटल चॅम्प्स’ स्पर्धेच्या अंतिम ऑडिशन फेरीपर्यंत ती जाऊन आलेली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त युट्युबवर सृष्टी देसाई हिने सादर केलेल्या ‘एकवार पंढरीला नवा…’ या गीताला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आणि सर्वांनी सृष्टीची वाहव्वा केली.Srushti desai

 belgaum

‘एक वार पंढरीला नेवा..’ या गीताची रचना आणि तालबद्धता तिची आई कीर्ती पाटील -देसाई यांनी केली असून संतोष गुरव व स्नेहल जाधव यांनी संगीत दिले आहे. बेळगावच्या रसिकांनी या गीताचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.