हलगा मच्छे बायपासच्या प्रश्नावर जिल्हाधिकार्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन तोडगा काढण्याची गरज आहे.हा प्रश्न खूप गंभीर आहे असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या दोन दिवसापासून हलगा मच्छे बायपासला जमीन देण्यास शेतकरी जोरदारपणे विरोध करत आहेत त्यावर पत्रकरांनी प्रश्न विचारला असता ते बोलत होते.
शेतकरी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यात योग्य तो तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारीनी प्रयत्न करायला हवे होते मात्र तसे प्रयत्न झाले नसल्याचे प्रतिपादन यमकनमर्डी चे आमदार आणि केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले आहे .
हलगा आणि मच्छे बायपासचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांना जर आपली जमीन द्यायची नसेल तर त्या संदर्भातील योग्य तो तोडगा काढण्याची गरज आहे.
सहानभूतीच्या मार्गाने आणि सामंजस्याने असे प्रश्न सोडवावे लागतात. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.