Saturday, November 16, 2024

/

विधान परिषद निवडणूक- ठरली काँग्रेसची रणनीती

 belgaum

आगामी 10 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या राज्यातील 25 जागांसाठी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले सत्ताधारी भाजप सह काँग्रेसने देखील रणनीती आखायला सुरू केली आहे.

विधान परिषदेच्या बेळगाव जिल्ह्यातून 2 जागा आहेत त्यासाठी कॉंग्रेसकडून तिघे जण इच्छुक आहेत ग्रामीण आमदारांचे बंधू चरणराज हट्टीहोळी, ए आय सी सी सदस्य सुनील हणमन्नावर, आणि साधून्नावर यांचा समावेश आहे.

या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी के पी सी सी अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या चर्चा केली आहे.बंगळुरू सदाशिवनगर येथील शिव कुमार यांच्या निवासस्थानी सतीश जारकीजोळी आणि शिवकुमार यांनी विधान परिषद निवडणुकी बाबत कोणती रणनीती काँग्रेस कडून झाली पाहिजे यावर चर्चा केली. उत्तर कर्नाटकात काँग्रेस पक्षाला कसे मजबूत करता येईल राज्यात जास्तीतजास्त जागा कश्या जिंकल्या जातील याबाबत चर्चा झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील दोन पैकी एक जागा कशी जिंकता येईल यावर कशी रणनीती बनवता येईल आणि उमेदवार कोण असू शकेल याबर दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याची चर्चा आहे.जिल्ह्यात दोन पैकी एका जागेवर काँग्रेस निवडणूक लढवावी का याबाबत प्रयत्नशील आहे.Satish dk

लोकसभा पोट निवडणूक आणि बेळगाव महा पालिका निवडणूक पराभवाला स्थानिक काँग्रेस नेते जबाबदार आहे असा आरोप सतीश जारकीहोळी यांनी केला होता त्यानंतर शिवकुमार आणि जारकीहोळी यांच्यात झालेल्या भेटीची आणि निवडणूक चर्चांची जोरदार चर्चा बेळगावातील कॉंग्रेसच्या गोटात होताना दिसत आहे.

यादोन्ही नेत्यांच्या भेटी नंतर बेळगाव जिल्ह्यात माजी कुणाला उमेदवारी द्यावी यावरही चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.के पी सी सी कडे तिघांचे प्रस्ताव बेळगाव जिल्ह्यातून गेले असले तरी आणखी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार ?अशी चर्चा रंगली आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.