भरधाव वेगाने निघालेल्या कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात प्रचंड नुकसान होण्याची शक्यता होती मात्र काहीजण बालंबाल बचावले आहेत. या अपघाताची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
शुक्रवारी सकाळी सुतगट्टी घाटात ही घटना घडली असून त्या कारमध्ये मोठ्या व्यक्तींसोबत एक चिमुकला मुलगाही होता. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार इतरत्र आपटली. त्या कार मधील साऱ्यांचे काय होणार? असा प्रश्न अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींना पडला होता .
मात्र सुदैवाने सारेजण बालंबाल बचावले आहेत. या मार्गावर वाहन वेग मोठ्या प्रमाणात असतो ,त्यात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
त्यामुळे वाहन चालकांनी महामार्गावरून जात असताना घाट किंवा इतर वळणाच्या प्रदेशात वाहनावरील नियंत्रण कायम राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अन्यथा नसते अनर्थ घडण्याची शक्यता जास्त असून या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.