मोबाईल गेम दाखवण्याच्या बहाण्याने एका तरुणाने आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केला असल्याची माहिती उघड झाली आहे .
शुक्रवारी काकती जवळील एका लाकडाच्या अड्ड्यात घडलेली ही घटना उघडकीस आली असून यामुळे एकच खळबळ माजली आहे.
मुलीने रडण्याचा आवाज करताच हा युवक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याला पकडण्यात यश आले आहे. त्याला काकती पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोग्य तपासणी करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
तर पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात आले आहे .
पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणातून कोणतेही दुसरे कृत्य घडू नये याची काळजी ते घेत आहेत.
दरम्यान संबंधित आठ वर्षे बालिकेला मोबाईल गेम शिकवण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार करण्यात आला असल्याचे उपलब्ध माहितीवरून समजत असून या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.