घरासमोर पार्क केलेल्या चार गाड्या फोडणाऱ्या युवकाला शहापूर पोलिसांनी केवळ 48 तासांच्या गजाआड केले आहे.सुशांत बाळकर वय 20 असे त्याचे नाव असून तो कचेरी गल्ली शहापूर भागांत रहाणारा आहे.
शनिवारी मध्यवर्ती सराफ गल्ली येथील सराफी व्यावसायिक गुणवन्त पाटील यांच्या घरासमोर लावलेल्या मारुती कारवार दगडफेक करून मोडतोड केली होती.याशिवाय कचेरी गल्लीतील घरासमोर लावलेल्या तीन गाड्या फोडल्या होत्या. याप्रकरणी शहापूर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली होती त्यानुसार पोलिसांनी तपास केला होता.
सी सी टी व्हीमध्ये अडकल्याने त्यानें गाड्यावर केलेला हल्ला समोर आला आहे.शहापूर पोलिसांनी त्याला गाड्यांची नासधूस केल्या प्रकरणी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
त्याने दारूच्या नशेत आपण हे कृत्य केलं समोर आले आहे नेमका गाड्या फोडण्याचा उद्देश्य काय होता याबाबत तपास सुरू आहे.
या घटनेच्या निमित्ताने पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे.मुलं व्यसनाधीन झाल्याने नाहक समाजाला त्रास होत आहे यामुळे पालकांना जबाबदार धरण्यात यावे असे लोकांतून मत व्यक्त होत आहे.