बेळगाव शहराच्या 24 तास पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ऑनलाइन बिल भरणा सुविधा उपलब्ध करण्यात आली असून ती नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे.
आता पाण्याचे ऑनलाईन बिल भरण्यासाठी ग्राहकांना https://belgaviwatersupply.org/ येथे लाॅगऑन करावयाचे आहे. त्याचप्रमाणे बिल भरण्यासाठी नेट बँकिंग/ यूपीआय/ वॉलेट अथवा कार्ड याचाही अवलंब करता येणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्टलच्या एका बाजूला युजर्स सर्च ऑप्शन असून त्याद्वारे ग्राहक आपले नांव शोधू शकतात, तर दुसऱ्या बाजूला खात्याची माहिती दिसणार असून त्याठिकाणी लाॅगऑन करून बिलाबाबत माहिती मिळवता येणार आहे.
ग्राहकांना आपले अकाऊंट मीटर नंबर किंवा सर्च निकषाद्वारे सिलेक्ट करता येणार आहे. सर्च निकषासाठी नांवाचे तीन-चार शब्दच पुरेसे ठरणार आहेत.