दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना च्या नव्या ओमीक्रॉन या विषाणू नंतर संपूर्ण जगातच पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारनेही कोरोनाच्या नव्या विषाणूची गंभीर दखल घेत विशेष मार्ग सूची जारी केली आहे.
राज्य सरकारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या नव्या विषाणू बाबत संपूर्ण देशभरातील नागरिकात जोरदार उलटसुलट चर्चा सुरू आहे. याच वेळी कर्नाटकात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार याबाबतही उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे.
कोरोना विषाणूच्या नव्या अवतारा नंतर बेंगलोर विमानतळावर आफ्रिकेतून आलेल्या दोन प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावून कोरोना विषाणू संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे.
सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आले आहेत.कोरोना नव्या विषाणू संदर्भात नागरिकांनी भीती बाळगू नये मात्र खबरदारी घेणे आवश्यक आहे. आजच्या घडीला सरकारचा लॉकडाऊन करण्याचा कोणताच विचार नाही.
शैक्षणिक संस्था बंद करण्याचाही कोणताच विचार नाही मात्र विद्यार्थ्यांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.मात्र कोरोना ची लाट थोपविण्यासाठी नागरिकांना नियमांचे पालन करावेच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.