बेळगाव महापालिकेचे नवे 58 नगरसेवक, तीन आमदार व एक खासदार अशा 64 जणांची यादी निवडणूक विभागाकडे पाठवून सर्व 64 जणांची नांवे विधान परिषद निवडणुकीच्या मतदार यादीत समाविष्ट करण्याची शिफारस बेळगाव महापालिकेने केली आहे. मात्र त्यांची नांवे मतदार यादीत समाविष्ट होणार का? त्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बेळगाव महापालिकेचे 58 नुतन नगरसेवक, तीन आमदार व एक खासदार अशा 64 जणांची यादी निवडणूक विभागाकडे पाठविण्यात आली असली तरी विशेष म्हणजे या यादीत यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी व चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले यांची नांवे नाहीत.
बेळगावच्या महापौर निवडणुकीत पदसिद्ध सदस्य म्हणून यमकनमर्डीचे आमदार व चिक्कोडीच्या खासदार यांचे नांव यादीत समाविष्ट केले जाते. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या यादीसाठी मात्र त्यांचे नाव गृहीत धरण्यात आलेले नाही. बेळगाव महापालिकेने 64 जणांची यादी निवडणूक विभागाकडे पाठविली असती तरी त्यांची नाव मतदार यादीत समाविष्ट होणार का? त्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार का. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. आयोगाने या 64 जणांना मतदानाचा अधिकार दिला तर त्यांची नांवे यादीत समाविष्ट केले जातील अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान महापौर निवडणूक कधी होणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा असे नगरसेवकांना वाटते.
तथापि त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार आहे. नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळाला तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे.