महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या 58 नगरसेवकांना विधान परिषदे निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्देश आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी दिले. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मनपा निवडणूक होऊन दोन महिने उलटले निवडणुकीत विजयी उमेदवारांची नोंद राज्याच्या राज्यपत्रात झाली आहे मात्र अद्याप त्यांचा शपथविधी झाला नसून सभागृह अस्तित्वात नाही त्यामुळे नूतन मनपा नगरसेवकाना विधान परिषदेत मतदानाचा हक्क आहे की नाही याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावेळी जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी वरील उत्तर देत निवडणूक आयोगाकडे याबाबत पत्र व्यवहार केला आहे त्यांच्या कडून निर्देश आल्यावरचं मतदानाचा हक्क मिळणार की नाही याबाबत स्पष्ट होणार असल्याचे म्हटले.
बेळगाव मनपात 35 भाजपचे नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क नाही मिळाल्यास बेळगावात भाजपला नुकसान होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे कालच समितीच्या दोघा नगरसेवकांनी त्वरित महापौर निवडणूक घ्या अशी मागणी करत प्रादेशिक आयुक्तांकडे साकडे घातले होते.
बेळगाव जिल्ह्यात तालुका आणि जिल्हा पंचायत सभागृह अस्तित्वात नाही त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत या सदस्यांना मतदान करता येणार नाही.
विधान परिषद निवडणुकीत लोकनियुक्त प्रतिनिधींना मतदान करायचा अधिकार आहे.सध्या बेळगाव जिल्ह्यात आमदार खासदार, ग्राम पंचायत सदस्य, नगरपालिका, नगर पंचायत सह महा पालिका आणि तालुका आणि जिल्हा पंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो.