विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रविवारी मतदान केंद्र निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
विधान परिषद निवडणुकीची कच्ची मतदार यादी गेल्या 11 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांकडून आक्षेप मागवण्यात आले होते. यासाठीची मुदत ठरविण्यात आली होती. काल रविवारी सुधारित व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत व इतर स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तालुका पंचायतीचे
मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदार कार्यालयात या सुधारित मतदार याद्या उपलब्ध करण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.