विधान परिषदेचे आमदार विवेकराव पाटील यांनी नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांची भेट घेऊन काल सोमवारी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला.

आमदार विवेकराव पाटील यांनी बेळगावात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पाटील भाजपात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार काल त्यांनी अधिकृत प्रवेश करून कमळ हाती घेतले आहे.
दिल्ली येथे त्यांच्या व प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटीली यांच्या भेटीप्रसंगी माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि अशोक असोदे उपस्थित होते. मागील निवडणुकीत विवेकराव पाटील यांनी निवडणूक लढवून 6 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
मतदारसंघावर त्यांची चांगली पकड असल्यामुळे भाजप पक्ष बळकटीला चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. याखेरीज याचा भाजप उमेदवाराला निश्चित लाभ होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.