महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल सोमवारी रात्री बेळगावला धावती भेट दिली.मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या कन्येच्या विवाह स्वागत समारंभास ते उपस्थित होते.यावेळी ओरिएंटल शाळा सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपस्थिती लावताना त्यानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत बेळगाव प्रश्नी औपचारिक चर्चा केली.
बेळगावातील अनेक समस्या बाबत जयंत पाटील यांना कार्यकर्त्यांनी माहिती दिली यावेळी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी माजी आमदार मनोहर किणेकर माजी महापौर मालोजी अष्टेकर,एस एल चौगुले, युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, दत्ता उघाडे महेश जुवेकरआदी उपस्थित होते.
जयंत पाटील लोकनेते म्हणून ओळखले जातात राजाराम बापू पाटील यांचा वारसा सांगणारे जयंत पाटील कार्यकर्त्याला आपलेसे करून घेण्यात माहिर म्हणून ओळखले जातात.राजाराम बापू पाटलांनी व्यक्तिशः कार्यकर्त्यांची ओळख ठेवत वैयक्तिक स्नेह बंध निर्माण करून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले होते त्याचं पावलावर पुढे जात कार्यकर्त्यांची बांधणी करत असतात .
या पाश्वभूमीवर बेळगाव येथील भांदूर गल्लीतील शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते अमित देसाई हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडियावर काम पहात असतात.
आपल्या व्यस्त शेड्युल मधूनही जयंत पाटील यांनी अमित देसाई यांची आठवण ठेवत त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली त्यांच्या कुटुंबियांशी देखील चर्चा केली.एखादा कार्यकर्ता सतत त्या नेऱ्याच्या पाठीशी का रहातो याचे हे जिवंत उदाहरण आहे.
बेळगाव येथे दौऱ्यावर असताना समाजमाध्यमावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू सक्रियपणे मांडणारे माझे सहकारी अमित देसाई यांच्या घरी भेट दिली.
आदरणीय पवार साहेब आणि पक्षावर प्रेम करणारे देसाई कुटुंबियांसारखे लोक हीच आपल्या पक्षाची खरी संपत्ती आहे.@PawarSpeaks@NCPspeaks pic.twitter.com/eR3Uv28xfX
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 22, 2021