खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये परप्रांतीयांनी जाळे पसरून इथल्या भूमीपुत्रांच्या व्यवसायांवर अतिक्रमण केले आहे. त्याविरोधात खानापुरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवार दि २६ रोजी बंदची हाक पुकारली आहे.
यात विविध संघटना सहभागी असून शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. येथील शिवस्मारकात पत्रकार परिषद झाली त्याप्रसंगी गौरेश सोनोळी यांनी ही माहिती दिली.
शुक्रवारीच्या खानापूर बंदला तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पाठिंबा दर्शविला आहे. भूमीपुत्रांच्या हक्कासाठीची ही लढाई असून वेळीच परप्रांतीयावर आवर घालने गरजेचे आहे. अन्यथा स्थानिक व्यापाऱ्यांवर मोठे संकट येईल. त्यासाठीच युवा समिती आंदोलनात सहभागी होत असल्याचे सचिव सदानंद पाटील यांनी म्हटले आहे.
खानापूर शहरात पर प्रांताहून आलेल्या व्यापाऱ्यानी वेगवेळ्या धंद्यात मोठ्याप्रमात अतिक्रमण केले आहे. दर्जा नसलेला माल कमी दरात ग्राहकांना देऊन फसवणूक चालविली आहे. त्यामुळे इथल्या भूमिपुत्र व्यावसायिकांवर धंदे बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यातील जागरूक नागरिकांनी परप्रांतीय हटाव आणि भूमीपूत्र बचाओ चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलं आहे.
शुक्रवारी सकाळी पारीश्वाड क्रॉस वर सर्वांनी 10 वाजता जमावे असे आवाहन करण्यात आले आहे त्या नंतर तहसीलदार यांना निवेदन दिले जाणार आहे