कर्नाटक राज्य सरकारने कोविड नियंत्रण करण्यासाठी लावलेला नाईट कर्फ्यु राज्यांतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.कर्नाटक राज्यात सर्वत्र कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारने हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे मुख्य सचिव पी रवी कुमार यांनी याबाबत एक अध्यादेश काढून रात्री 10 ते पहाटे 5 पर्यन्त लागू असलेला रात्रीची संचार बंदी रद्द करण्याचा आदेश बजावला आहे.
मुख्य सचिवांच्या आदेश हॉर्स रायडिंग ला कोविड नियमावलीचे पालन करून अनुमती देण्यात आली आहे.
कोणतीही शर्यत किंवा हॉर्स रायडिंग त्या जागेच्या बैठक क्षमतेवर आणि लसीकरण झालेल्या प्रेक्षकांना प्रवेश दिला जावा या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.
गेल्या कित्येक महिन्यापासून राज्यात रात्रीची संचार बंदी लागू करण्यात आली होती आता कोविड रुग्णांची संख्या घटल्याने रात्रीची संचारबंदी रद्द करण्यात आली आहे.